आदर्श पतसंस्थेच्या ५८.१८ कोटींच्या ४६ संपत्तींच्या लिलावास गृह विभागाची मंजुरी

आदर्श पतसंस्थेच्या ५८.१८ कोटींच्या ४६ संपत्तींच्या लिलावास गृह विभागाची मंजुरी

छत्रपती संभाजीनगर: आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेच्या संचालक आणि व्यवस्थापकांच्या वैयक्तिक नावावर असलेल्या ५८.१८ कोटी रुपयांच्या ४६ संपत्तींच्या लिलावासाठी गृह विभागाने मंजुरी दिली आहे. लवकरच जिल्हाधिकारी कार्यालयाने पुढील प्रक्रिया सुरू करण्याची शक्यता आहे, असे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.

१२ जुलै २०२३ रोजी आदर्श पतसंस्थेच्या २०२ कोटी रुपयांच्या घोटाळ्याच्या प्रकरणात अंबादास मानकापे आणि अन्य संचालकांवर गुन्हा दाखल झाला होता. यानंतर, पैसे परत मिळवण्यासाठी ठेवीदारांनी मोठे आंदोलन केले. ३ ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्याच्या वेळी मानकापेच्या मालमत्तेसंदर्भात ठेवीदारांनी आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. आर्थिक गुन्हे शाखेने मुंबईला पाठवलेल्या प्रस्तावाच्या प्रक्रियेणे वेग घेतल्याने १४ ऑगस्ट रोजी गृह विभागाकडून आदेश जारी करण्यात आले.

हे देखील वाचा: Majhi Ladki Bahin Yojana: रकमेत होणार वाढ, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही

मानकापे व आदर्शच्या मालमत्तेचा तपशील:

२०१६ ते २०१९: १०३ कोटी १६ लाख ७३ हजार ३८१ रुपये
२०१८ ते २०२३: ९९ कोटी सात लाख ९० हजार ५७९ रुपये

संपत्तीचा तपशील:

मानकापे कुटुंब: ४६ संपत्ती
आदर्श ग्रुप: १९ संपत्ती
मानकापे व अन्य संचालक: ३९ संपत्ती

लिलावासाठी दिलेल्या १०४ संपत्तीत वाहने, पेट्रोल पंप, शेती, बंगले, फ्लॅट्स, हॉटेल, बार, संस्थेचे कार्यालय, मंगल कार्यालय, रुग्णालय, अपार्टमेंट, आणि गाळे यांचा समावेश आहे. या संपत्तेची रेडीरेकनरनुसार किंमत ९९ ते १०० कोटी रुपये आहे, तर बाजारभावानुसार (मार्केट व्हॅल्यू) २५० कोटी रुपयांपर्यंत असू शकते. लिलावासाठी नियुक्त समिती आणि उपनिबंधक कार्यालयाच्या समितीने या दोन दरांमधून योग्य दर निश्चित करावा.

हे देखील वाचा: EPFO खात्यात जमा झाली व्याजाची रक्कम, 7 कोटी पीएफ खातेदारांसाठी खुशखबर; असे करा तपास

ठेवीदारांना पैसे परत करण्याची स्थिती:

१४ ऑगस्टपर्यंत ४४५ ठेवीदारांना २२ लाख २३ हजार ३२० रुपये परत करण्यात आले आहेत. सध्या आदर्श पतसंस्थेकडे ३ कोटी रुपये जमा आहेत आणि यामध्ये वाढ होऊन ही रक्कम ४ कोटीपर्यंत पोहोचेल, असे प्रशासक सुरेश काकडे यांनी स्पष्ट केले. ठेवीदारांना पैसे परत करण्याचा दुसरा टप्पा येत्या दोन दिवसांत सुरू होईल.

३९ संपत्त्यांच्या जप्तीचा प्रस्ताव:

४६ संपत्त्यांच्या लिलावासोबतच आर्थिक गुन्हे शाखा गृह मंत्रालयाकडे ३९ संपत्त्यांच्या जप्ती आणि लिलावासाठी दुसऱ्या प्रस्तावासंदर्भात सादर करणार आहे, असे निरीक्षक संभाजी पवार यांनी सांगितले.

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
WhatsApp
Facebook
Twitter
LinkedIn
Telegram
मराठी ईनसाइडर Black logo

Marathi Insider हे भारतातील क्रमांक १ चे विश्वासार्ह आणि लोकप्रिय प्रादेशिक मराठी बातम्या देणारा गट आहे. आम्ही फक्त ताज्या घडामोडींची बातमी देत नाही, तर सरकारच्या योजना, तंत्रज्ञान, मोबाईल फोन, लॅपटॉप्स, स्मार्टवॉचेस आणि सोशल मीडियाचे सखोल विश्लेषण देखील करतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

लोकप्रिय कथा
कॅटेगरिज

ट्रेंडिंग बातम्या