मुख्यमंत्र्यांचे पावसामुळे झालेल्या नुकसानीचे ताबडतोब पंचनामे करण्याचे निर्देश

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे: पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे निर्देश

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी (दि.३) मुसळधार पावसामुळे मराठवाडा, विदर्भ आणि इतर भागात झालेल्या नुकसानीची तातडीने माहिती घेतली जावी, असे निर्देश दिले आहेत. या संदर्भात, पिकांचे नुकसान, घरांची पडझड, पशुधनाची हानी इत्यादी सर्व बाबींचे पंचनामे करण्यात यावेत आणि अतिवृष्टीमुळे स्थलांतरित झालेल्या लोकांना आवश्यक असलेली मदत तात्काळ उपलब्ध करुन देण्यात यावी, असे त्यांनी सांगितले.

हे देखील वाचा: मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या लाभार्थी महिलांना 31 ऑगस्टपासून मिळणार 4500 रुपये

मुख्यमंत्र्यांनी विभागीय आयुक्त, जिल्हा प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभाग, स्थानिक नगरपालिका, महानगरपालिका, ग्रामपंचायती, पोलीस प्रशासन यांना समन्वयाने कामकाज करण्याचे निर्देश दिले आहेत. आपत्ती व्यवस्थापन कक्ष २४ तास खुला ठेवावा, तसेच मदत व पुनर्वसनाचे कार्य त्वरित सुरळीत करण्यात यावे, असेही त्यांनी नमूद केले आहे. स्थलांतरित लोकांसाठी चांगल्या दर्जाचे तात्पुरते निवारे उभारावीत आणि त्यांना कपडे, अन्न, शुद्ध पाणी, औषधे इत्यादी जीवनावश्यक वस्तूंचा ताबडतोब पुरवठा करण्यात यावा, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.

हे देखील वाचा: Post Office RD Scheme: पोस्ट ऑफिसचे लेटेस्ट सुरक्षित आणि आकर्षक गुंतवणूक पर्याय

पाटबंधारे विभाग आणि हवामान खात्याशी समन्वय ठेवून आवश्यक माहिती त्वरित दिली जावी. आपतग्रस्त लोकांच्या मदतीसाठी आपत्कालीन हेल्पलाइन आणि कंट्रोल रूम त्वरित कार्यान्वित कराव्यात. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी शाळा आणि महाविद्यालयां संदर्भात स्थानिक परिस्थितीचा विचार करून जिल्हा प्रशासनाने निर्णय घ्यावा, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासनाला सांगितले आहे.

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
WhatsApp
Facebook
Twitter
LinkedIn
Telegram
मराठी ईनसाइडर Black logo

Marathi Insider हे भारतातील क्रमांक १ चे विश्वासार्ह आणि लोकप्रिय प्रादेशिक मराठी बातम्या देणारा गट आहे. आम्ही फक्त ताज्या घडामोडींची बातमी देत नाही, तर सरकारच्या योजना, तंत्रज्ञान, मोबाईल फोन, लॅपटॉप्स, स्मार्टवॉचेस आणि सोशल मीडियाचे सखोल विश्लेषण देखील करतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

लोकप्रिय कथा
कॅटेगरिज

ट्रेंडिंग बातम्या