Breast Cancer Precaution: जेव्हा आपल्याला ‘कर्करोग’ हा शब्द ऐकावा लागतो, तेव्हा भितीने अंगावर काटा येतो. काही काळापूर्वी स्तन कर्करोग मुख्यतः पन्नाशीनंतर होणारा मानला जात होता; पण गेल्या वीस वर्षांच्या पाहणीनुसार, आता स्तन कर्करोग कमी वयोमानातील महिलांमध्ये देखील होऊ लागला आहे. उदाहरणार्थ, गोमेकॉत २६ वर्षांची एक स्त्री स्तन कर्करोगामुळे उपचार घेत आहे.
पूर्वी मायलोमा (कर्करोगाचा एक प्रकार) ६० वर्षांवरील लोकांना होणारा होता; पण आता तो ३५ वर्षांच्या व्यक्तींमध्येही होऊ लागला आहे. तरुण वयात कर्करोग होण्याचं एक मुख्य कारण म्हणजे पाश्चिमात्य जीवनशैली. आपल्या आहाराची निवड स्थानिक आणि पौष्टिक असावी, हेल्थ साठी जीवनशैली सुधारली पाहिजे, आणि किमान ४० मिनिटे दररोज व्यायाम करावा लागतो. याशिवाय, ताण कमी करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
हे देखील वाचा: पोटाच्या कर्करोगाचे कारण ठरू शकते मिठाचे जास्त सेवन; संशोधन काय सांगते?
गोमेकॉत कर्करोग रुग्णांची संख्या वाढली
गोमेकॉत एक वर्षात सुमारे १,३०० कर्करोग रुग्णांनी उपचार घेतले आहेत. परंतु, या आकड्यांवरून राज्यात कर्करोग वाढत आहे असं म्हणता येणार नाही, कारण आपल्याकडे अनेक वर्षांची आकडेवारी नाही. त्याचबरोबर, कर्करोगाबद्दल जागरूकतेचा वाढता स्तर देखील कारणीभूत आहे, ज्यामुळे अधिक लोक उपचारासाठी येत आहेत. त्यामुळे राज्यात रुग्णांची संख्या वाढत आहे की नाही, हे निश्चितपणे सांगता येत नाही, पण गोमेकॉत कर्करोगाशी संबंधित उपचार घेणाऱ्या रुग्णांमध्ये निश्चितच वाढ दिसून येत आहे.
मानसिक आधाराची महत्त्वता
कर्करोगाने झुंज देणाऱ्या रुग्णांना सामाजिक आणि मानसिक आधार देखील अत्यंत आवश्यक असतो. तसेच, जे लोक कर्करोगावर मात करून बरे झाले आहेत, अशा व्यक्तींशी संवाद साधल्याने इतर रुग्णांना ताकद मिळते. यामध्ये सकारात्मक दृष्टिकोन ठेऊन लढाईचा सामना करणे आवश्यक आहे.
हे देखील वाचा: ग्लोईंग त्वचेचे सौंदर्य खुलविण्याचे १० घरगुती उपाय
कर्करोग रुग्णांची नोंदणी
राज्यात कर्करोगग्रस्तांची नोंदणी केली जात नाही, पण यावर्षी राज्यात कर्करोग रुग्णांची नोंदणी केली जाणार आहे. यामुळे किती रुग्ण बरे झाले, तसेच इतर संबंधित माहिती मिळवली जाईल. पुढील पाच वर्षांची आकडेवारी पाहून, कर्करोग रुग्णांची संख्या वाढत आहे की घटत आहे, हे सांगता येईल. यासाठी नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.