PM Vidyalaxmi Scheme: पंतप्रधान विद्यालक्ष्मी योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना उच्चशिक्षणासाठी शैक्षणिक कर्ज आणि शिष्यवृत्त्या मिळवता येऊ शकतात. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी सरकारने विद्यालक्ष्मी पोर्टल नावाचे एक ऑनलाइन पोर्टल तयार केले आहे. विद्यार्थ्यांना या पोर्टलच्या माध्यमातून विविध बँकांकडून शैक्षणिक कर्ज घेण्याची आणि शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याची सुविधा मिळते.
अर्ज कसा करावा?
विद्यालक्ष्मी योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज प्रक्रिया सोपी केली आहे. अर्ज कसा करावा, हे आपण पाहूया.
1. सर्वप्रथम रजिस्ट्रेशन करा
विद्यालक्ष्मी योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर जा आणि रजिस्ट्रेशन ऑप्शनवर क्लिक करा. नंतर आपले नाव, पत्ता, ईमेल आयडी इत्यादी माहिती भरून रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण करा. रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तुम्हाला एक रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड मिळेल. ह्या नंबर आणि पासवर्डचा वापर करून तुम्ही भविष्यात वेबसाइटवर लॉग इन करू शकता.
2. अर्ज भरा
लॉग इन केल्यानंतर, तुम्हाला विद्यालक्ष्मी योजनेसाठी अर्ज करण्याचा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा आणि आवश्यक माहिती भरून अर्ज पूर्ण करा. यामध्ये शैक्षणिक माहिती, कुटुंबाचे उत्पन्न, आणि इतर संबंधित माहिती भरावी लागेल.
3. आवश्यक कागदपत्रे अपलोड करा
अर्ज करताना काही महत्त्वाची कागदपत्रे अपलोड करावीत. यामध्ये तुमचा आधार कार्ड, कुटुंबाचे उत्पन्न प्रमाणपत्र, 12 वी गुणपत्रिका, जात प्रमाणपत्र (आवश्यक असल्यास), रहिवासी प्रमाणपत्र आणि इतर आवश्यक कागदपत्रांचा समावेश आहे.
4. अर्ज सबमिट करा
सर्व माहिती आणि कागदपत्रे भरल्यानंतर, तुमचा अर्ज एकदा तपासून योग्य आहे की नाही हे पाहा. त्यानंतर सबमिट बटनावर क्लिक करून तुमचा अर्ज पोर्टलवर सबमिट करा.
तुमचा अर्ज सबमिट झाल्यानंतर तो तपासला जाईल. जर अर्ज मंजूर झाला, तर तुम्हाला ई-मेल किंवा मोबाईलवर मेसेजच्या माध्यमातून सूचित केले जाईल.
अशाप्रकारे तुम्ही पीएम विद्यालक्ष्मी योजनेचा लाभ घेऊ शकता.