छत्रपती संभाजीनगरहून अहमदनगरला रेल्वेची ‘डबल लाइन’

छत्रपती संभाजीनगरहून अहमदनगरला रेल्वेची ‘डबल लाइन’

छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर-अहमदनगर मार्गावर ‘डीपीआर’ तयार करण्यात आले आहे. परंतु, सध्याचा ‘डीपीआर’ एकेरी मार्गाचा आहे, त्यामुळे दुहेरी रेल्वेमार्गाचा ‘डीपीआर’ तयार करण्याची सूचना देण्यात आली आहे. यानुसार, दुहेरी रेल्वेमार्गाचा ‘डीपीआर’ तयार करण्याचे काम सध्या सुरू आहे आणि ते नोव्हेंबरपर्यंत पूर्ण होईल. या रेल्वेमार्गावर १३ रेल्वे स्टेशन राहतील, अशी माहिती खासदार डॉ. भागवत कराड यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.

हे देखील वाचा: आता रोजगारच रोजगार: छत्रपती संभाजीनगरमध्ये औद्योगिक शहर वसणार, देशभर 12 ठिकाणी विकासाचा हुंकार

खासदार डॉ. कराड यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवारी रेल्वे स्टेशनवर रेल्वेप्रश्नांवर बैठक झाली. या बैठकीस जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाच्या व्यवस्थापक (डीआरएम) नीती सरकार, निरज अग्रवाल, मध्य रेल्वेचे आर. के. यादव, अनंत बोरकर आदी उपस्थित होते. या बैठकीसंबंधी डॉ. कराड यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. रेल्वे स्टेशनवर सध्या सुरू असलेल्या १६ बोगींच्या पीटलाइनचे काम सप्टेंबरअखेर पूर्ण होऊन ऑक्टोबरमध्ये केंद्रीय रेल्वेमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन होईल. ही पीटलाइन पुढे २४ बोगींची होईल. मालधक्का दौलताबादला स्थलांतरित झाल्यानंतर बाजूलाच आणखी एक पीटलाइन होईल, अशी माहिती डॉ. कराड यांनी दिली.

वांबोरीमार्गे जाईल रेल्वेमार्ग, हे राहणार स्टेशन

छत्रपती संभाजीनगर-अहमदनगर रेल्वेमार्ग वांबोरीमार्गे जाईल. या मार्गावर डोंगराचा अडथळा येईल. या मार्गावर साजापूर, आंबेलोहोळ, येसगाव, बाबरगाव, गंगापूर, जामगाव, देवगड, नेवासा, उस्थल दुमला, खारवांडी, शनिशिंगणापूर, मोरे चिंचोरे, ब्राह्मणी अशी स्टेशन असतील.

हे देखील वाचा: राज्यात लवकरच एक लाख कोटी रुपयांची गुंतवणूक होणार

बीड-पैठण-छत्रपती संभाजीनगर आणि चाळीसगाव रेल्वेमार्गासाठी प्रयत्न

बीड-पैठण-छत्रपती संभाजीनगर आणि छत्रपती संभाजीनगर-वेरुळ-कन्नड-चाळीसगाव रेल्वेमार्गे इकोनॉमिक इंटर्नल रेट ऑफ रिटर्न (ईआयआरआर) च्या माध्यमातून सुरू करण्याची मागणी केंद्रीय रेल्वेमंत्र्यांकडे केली जाईल, असे डॉ. कराड यांनी सांगितले.

हे देखील वाचा: आदर्श पतसंस्थेच्या ५८.१८ कोटींच्या ४६ संपत्तींच्या लिलावास गृह विभागाची मंजुरी

हेही होणार

– रेल्वे स्टेशनच्या नव्या इमारतीत रेल्वे रुळावर ५०,००० स्के. फूटचे छत, विमानतळाप्रमाणे कमर्शियल शॉप्स, रेस्टॉरंट्स, चार दादरे असतील.
– नव्या इमारतीत वेरुळ लेणीसह ऐतिहासिक स्थळांचे स्वरूप देण्यात येईल.
– मुकुंदवारी रेल्वे स्टेशनचाही विकास करण्यात येईल.
– अंकाई (मनमाड)-छत्रपती संभाजीनगर रेल्वेमार्गाचे ९६४ कोटीतून दुहेरीकरण होईल.
– उस्मानपुरा रेल्वेगेटवर भुयारी मार्ग, रेल्वे स्टेशन एमआयडीसीत उड्डाणपूल होईल. ‘डीपीआर’साठी ७० कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.
– दौलताबाद येथे मालधक्क्यासाठी ९ एकर जागा मिळाली असून, आणखी ३ एकर मिळणार आहेत.
– भांगसी माता गड रस्त्यावर रेल्वेगेटवर भुयारी मार्गाचे काम सुरू आहे.
– गणेशनगर येथे रेल्वे रुळावर स्लॅब टाकून मार्ग सुसाध्य केला जाईल, ज्यामुळे शिवाजीनगरवासीयांना फायदा होईल.
– लासूर स्टेशन येथे दोन भुयारी मार्ग होणार आहेत.

हे देखील वाचा: Toyota: टोयोटा महाराष्ट्रात ₹20,000 कोटींचा गुंतवणूक करणार, उपमुख्यमंत्री म्हणाले – 8,000 लोकांना रोजगार मिळेल

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
WhatsApp
Facebook
Twitter
LinkedIn
Telegram
मराठी ईनसाइडर Black logo

Marathi Insider हे भारतातील क्रमांक १ चे विश्वासार्ह आणि लोकप्रिय प्रादेशिक मराठी बातम्या देणारा गट आहे. आम्ही फक्त ताज्या घडामोडींची बातमी देत नाही, तर सरकारच्या योजना, तंत्रज्ञान, मोबाईल फोन, लॅपटॉप्स, स्मार्टवॉचेस आणि सोशल मीडियाचे सखोल विश्लेषण देखील करतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

लोकप्रिय कथा
कॅटेगरिज

ट्रेंडिंग बातम्या