EPFO Passbook: केंद्र सरकारने ईपीएफओ खातेदारांना आनंदाची बातमी दिली आहे. त्यांच्या EPFO खात्यात व्याजाची रक्कम जमा झाली आहे, ज्यामुळे कोट्यवधी खातेदारांना दिलासा मिळाला आहे. खात्यात रक्कम जमा झाली की नाही, हे तपासण्यासाठी खालील पद्धतींचा वापर करू शकता.
केंद्र सरकारने ईपीएफओ (Employees’ Provident Fund Organization) खातेदारांच्या खात्यात 8.25% वार्षिक दराने व्याजाची रक्कम जमा करण्यास सुरुवात केली आहे. देशभरातील कोट्यवधी खातेदारांच्या खात्यात ही रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे. तरीही, सर्व खातेदारांच्या खात्यात लगेचच रक्कम जमा झाली नाही. पण ही प्रक्रिया लवकरच पूर्ण होईल. तुम्हाला तुमच्या खात्यात रक्कम जमा झाली आहे का, हे तपासण्याची आवश्यकता आहे.
हे देखील वाचा: EPFO: कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, आता PF काढणे झाले सोपे, नियम आणि प्रक्रिया जाणून घ्या
7 कोटींहून अधिक खातेदारांना दिलासा
देशभरातील 7 कोटींहून अधिक खातेदारांना केंद्र सरकारने मोठा दिलासा दिला आहे. ईपीएफओ 8.25% वार्षिक दराने व्याजाची रक्कम जमा करत आहे. यावर्षी फेब्रुवारी महिन्यात केंद्रीय मंडळाने शिफारस केल्यानंतर अर्थ मंत्रालयाने मे महिन्यात 8.25% व्याज दर निश्चित केला होता. या दराने व्याजाची रक्कम जमा केली जात आहे.
इतक्या सदस्यांच्या खात्यात रक्कम
आतापर्यंत EPFO ने 23,04,516 सदस्यांच्या खात्यात वार्षिक 8.25% व्याजदराने एकूण 9,260.40 कोटी रुपयांची रक्कम जमा केली आहे. फेब्रुवारी महिन्यात ईपीएफओने आर्थिक वर्ष 2023-24 साठी 8.25% व्याजदराची घोषणा केली होती. लवकरच या व्याजाची रक्कम सदस्यांच्या खात्यात जमा होईल.
या पद्धतीने तपासा बॅलन्स
काही सदस्यांना पासबुकमध्ये शिल्लक रक्कम तपासण्याची माहिती नसते. खात्यातील शिल्लक रक्कम तपासण्यासाठी खालील पद्धती वापरू शकता:
उमंग ॲपद्वारे तपासा बॅलन्स
- स्मार्टफोनवर प्ले स्टोअरवरून उमंग ॲप डाउनलोड करा.
- तुमचा फोन नंबर रजिस्टर करून ॲपमध्ये लॉग इन करा.
- वरच्या डाव्या कोपऱ्यातील मेनूवर क्लिक करा.
- EPFO पर्यायावर क्लिक करा.
- ‘व्ह्यू पासबुक’ मध्ये जाऊन OTP द्वारे तुमचा UAN क्रमांक आणि शिल्लक तपासा.
मिस्ड कॉलद्वारे PF मधील शिल्लक जाणून घ्या
तुम्हाला तुमच्या पीएफ बॅलन्सबद्दल माहिती हवी असेल, तर तुमच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरून 011 22901406 किंवा 9966044425 या क्रमांकावर मिस्ड कॉल द्या.
एसएमएसद्वारे जाणून घ्या शिल्लक
तुम्ही तुमच्या पीएफ खात्यातील शिल्लक घरबसल्या मोबाईलवरून तपासू शकता. ईपीएफओकडे नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावरून 7738299899 वर EPFO UAN LAN (भाषा) असा संदेश पाठवा. इंग्रजीत माहिती हवी असल्यास, LAN ऐवजी ENG टाइप करा आणि मराठीसाठी MAR लिहा. हिंदीत माहिती हवी असल्यास, EPFOHO UAN HIN असा संदेश पाठवा. तुम्हाला लगेचच शिल्लक माहिती मिळेल.
EPFO पोर्टलवर तपासा बॅलन्स
- EPFO Passbook संकेतस्थळावर जा.
- तुमचा UAN आणि पासवर्ड नोंदवा.
- तुम्हाला पीएफ पासबुक एक्सेस करता येईल. येथे ओपनिंग आणि क्लोजिंग बॅलन्ससह कर्मचारी आणि कंपनीचे योगदान दिसेल. पीएफ हस्तांतरणाची एकूण रक्कम आणि पीएफवरील व्याजाची रक्कम देखील दिसेल.