डोमिसाईल प्रमाणपत्र कसे काढायचे?: ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया

डोमिसाईल प्रमाणपत्र कसे काढायचे? - ऑनलाईन अर्ज प्रक्रिया व कागदपत्रे

डोमिसाईल प्रमाणपत्र मिळवण्यासाठी तहसीलदार कार्यालयातील सेतू सुविधा केंद्र किंवा ‘आपले सरकार’ या संकेतस्थळावर अर्ज करता येतो. यासाठी https://aaplesarkar.mahaonline.gov.in/ या वेबसाइटवर उपलब्ध सेवा वापरता येते.

आवश्यक कागदपत्रे

1. ओळखीचा पुरावा –

1. पॅनकार्ड
2. पासपोर्ट
3. आधारकार्ड
4. मतदान ओळखपत्र
5. छायाचित्र
6. निमशासकीय ओळखपत्र
7. रोजगार हमी योजना ओळखपत्र
8. वाहनचालक परवाना

हे देखील वाचा: मतदान ओळखपत्रासाठी ऑनलाइन अर्ज कसा करावा? प्रक्रिया, पात्रता आणि आवश्यक कागदपत्रे

2. पत्त्याचा पुरावा –

1. पासपोर्ट
2. वीज देयक
3. दूरध्वनी देयक
4. शिधापत्रिका
5. भाडेपावती
6. मालमत्ता कर पावती
7. मालमत्ता नोंदणी उतारा
8. ७/१२ आणि ८अ उतारा

3. वयाचा पुरावा –

1. जन्मदाखला
2. बोनाफाईड सर्टिफिकेट
3. शाळा सोडल्याचा दाखला
4. वडिलांचे डोमिसाईल प्रमाणपत्र
5. सेवा पुस्तिका (शासकीय/निमशासकीय कर्मचारी)

हे देखील वाचा: Instant E-PAN Application: तत्काळ ई-पॅन अर्जाची स्टेप-बाय-स्टेप प्रक्रिया

4. रहिवासाचा पुरावा:

1. ग्रामसेवक, तलाठी किंवा जिल्हाधिकारी यांच्याकडून मिळालेला रहिवासी दाखला
2. विद्यार्थ्यांसाठी 18 वर्षांखालील असल्यास बोनाफाईड प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला.

अर्जाची फी सामान्यतः 40 रुपये असते.

डोमिसाईल प्रमाणपत्रासाठी अर्ज केल्यानंतर 8 ते 15 दिवसांचा कालावधी लागतो. जर 15 दिवसांत प्रमाणपत्र मिळालं नाही तर ‘आपले सरकार’च्या वेबसाइटवर लॉग इन करून अपील अर्ज सादर करता येतो.

ऑनलाईन अर्ज कसा करायचा

1. अधिकृत संकेतस्थळावर (https://aaplesarkar.mahaonline.gov.in/) जा आणि “नवीन वापरकर्ता नोंदणी” पर्यायावर क्लिक करा.
2. आवश्यक माहिती (नाव, मोबाईल नंबर, ई-मेल आयडी) भरून लॉग इन करा.
3. डॅशबोर्डवर “महसूल विभाग” आणि नंतर “महसूल सेवा” या पर्यायावर क्लिक करा.
4. “वय, राष्ट्रीयत्व व डोमिसाईल प्रमाणपत्र” हा पर्याय निवडा.
5. आवश्यक कागदपत्रांची यादी पाहा, आणि वैयक्तिक व पत्त्याची माहिती भरा.
6. कागदपत्रे 75 ते 500 केबीच्या आत असावी.
7. फोटो आणि सही अपलोड करा, आणि नंतर अर्ज सादर करा.
8. शुल्क भरल्याची पावती प्रमाणपत्र मिळेपर्यंत ठेवा.

आजच अर्ज करा आणि महत्त्वाच्या कामांमध्ये धावाधाव टाळा!

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
WhatsApp
Facebook
Twitter
LinkedIn
Telegram
मराठी ईनसाइडर Black logo

Marathi Insider हे भारतातील क्रमांक १ चे विश्वासार्ह आणि लोकप्रिय प्रादेशिक मराठी बातम्या देणारा गट आहे. आम्ही फक्त ताज्या घडामोडींची बातमी देत नाही, तर सरकारच्या योजना, तंत्रज्ञान, मोबाईल फोन, लॅपटॉप्स, स्मार्टवॉचेस आणि सोशल मीडियाचे सखोल विश्लेषण देखील करतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

लोकप्रिय कथा
कॅटेगरिज

ट्रेंडिंग बातम्या