Toyota: जपानची ऑटोमोबाईल उत्पादक कंपनी टोयोटा किर्लोस्कर मोटरने बुधवारी महाराष्ट्र सरकार सोबत एक महत्वाचा करार (एमओयू) केला आहे. या करारानुसार, टोयोटा किर्लोस्कर मोटर कंपनी महाराष्ट्रातील मराठवाड्यातील ‘छत्रपती संभाजी नगर’ येथे एक नवीन मॅन्युफॅक्चरिंग प्लांट उभारणार आहे, ज्यासाठी कंपनी ₹20,000 (वीस हजार) कोटींची गुंतवणूक करणार आहे.
हे देखील वाचा: राज्यात लवकरच एक लाख कोटी रुपयांची गुंतवणूक होणार
टोयोटाचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मासाकाझू योशिमुरा यांनी सांगितले की, “आज आम्ही एमओयूवर स्वाक्षर करून देशाच्या विकासाच्या पुढील टप्प्यात प्रवेश केला आहे, ज्यामुळे आम्ही स्थानिक आणि जागतिक स्तरावर क्वालिटेटिव मोबिलिटी सोल्यूशन्ससह जीवन समृद्ध करण्यात योगदान देऊ शकू.”
या संधीवर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “छत्रपती संभाजी नगर येथे टोयोटा किर्लोस्कर मोटर कंपनीद्वारे ₹20,000 कोटींचा गुंतवणूक महाराष्ट्राला ऑटोमोबाईल क्षेत्रात पुढे नेईल. या गुंतवणुकीमुळे 8,000 थेट आणि 12,000 अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत.” उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्लांटसाठीच्या ₹20,000 कोटींच्या गुंतवणुकीचा आकडा सोशल मीडिया वर शेअर केला आहे.