Ladki Bahin Yojna: लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता मिळाला! ‘इतके’ रुपये जमा झाले!

Maharashtra gov ladki bahin yojna

Ladki Bahin Yojna: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचा पहिला हप्ता लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. पहिला आणि दुसरा हप्ता एकत्रितपणे लाभार्थींच्या खात्यात जमा करण्यात आला आहे.

भाजप नेते राम सातपुते यांचे ट्वीट

भाजप नेते राम सातपुते यांनी ट्वीट केले की, “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा प्रत्यक्ष लाभ घेण्यास सुरूवात झाली आहे. रक्षाबंधनाच्या पवित्र औचित्याचा लाभ घेत, स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला महाराष्ट्रातील बहिणींना या योजनेचा लाभ मिळायला सुरुवात झाली आहे. 31 जुलैपूर्वी अर्ज सादर केलेल्या महिलांच्या खात्यात जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांच्या लाभाची रक्कम, प्रत्येकी 3000 रुपये वर्ग करण्यात आली आहे. 31 जुलै नंतर अर्ज केलेल्या महिलांच्या खात्यात लवकरच लाभाची रक्कम जमा केली जाईल.”

आधार कार्डशी लिंक नसलेल्या खात्यांची समस्या

अर्ज दाखल केलेल्या 27 लाख महिलांचे खाते आधार कार्डशी लिंक नसल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे त्या महिलांना लाभ मिळवण्यासाठी 17 ऑगस्टपर्यंत खाते लिंक करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अतिरिक्त स्पष्टीकरण

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले, “17 तारखेला दोन हफ्ते देणार आहोत. आता आम्ही तपासत आहोत की पैसे जात आहेत का नाही. आम्ही वचन दिले आहे की 17 तारखेला आमच्या लाडक्या बहिणींच्या खात्यात जुलै आणि ऑगस्टचे दोन हप्ते जमा होतील.”

लाभार्थी महिलांच्या खात्यात पैसे जमा करण्यास सुरुवात झाली आहे. “आता विरोधकांना विचारा, त्यांच्याकडे काय उत्तर आहे? आम्ही आधीच सांगितले आहे की, सावधान रहा. विरोधकांनी हायकोर्टात देखील जाऊन देखील लढा दिला, पण हायकोर्टाने त्यांना फटकारले आहे.”

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
WhatsApp
Facebook
Twitter
LinkedIn
Telegram
मराठी ईनसाइडर Black logo

Marathi Insider हे भारतातील क्रमांक १ चे विश्वासार्ह आणि लोकप्रिय प्रादेशिक मराठी बातम्या देणारा गट आहे. आम्ही फक्त ताज्या घडामोडींची बातमी देत नाही, तर सरकारच्या योजना, तंत्रज्ञान, मोबाईल फोन, लॅपटॉप्स, स्मार्टवॉचेस आणि सोशल मीडियाचे सखोल विश्लेषण देखील करतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

लोकप्रिय कथा
कॅटेगरिज

ट्रेंडिंग बातम्या