राज्यात लवकरच एक लाख कोटी रुपयांची गुंतवणूक होणार

राज्यात लवकरच एक लाख कोटी रुपयांची गुंतवणूक होणार

महाराष्ट्रात येत्या आठ-दहा दिवसांत एक लाख कोटी रुपयांची गुंतवणूक येणार असल्याची माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली. या गुंतवणुकीचा उपयोग राज्यातील विविध विभागांत होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

गेल्या काही दिवसांत मराठवाड्यात टोयोटा, एथर, किर्लोस्कर आणि लुब्रीझॉल या कंपन्यांनी ५४ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे, ज्यात काही कंपन्यांना जमीन देण्यात आली आहे. या गुंतवणुकीमुळे २० हजार लोकांना रोजगार उपलब्ध होईल. विधानसभा निवडणुकीपूर्वी या गुंतवणुकीबाबत खोटे आरोप केले जात आहेत. याला उत्तर देताना कंपन्यांच्या व्यवस्थापनातील अधिकाऱ्यांसह उद्योजकांनी एक कार्यक्रम आयोजित करून सत्कार घडवून आणल्याची माहिती उदय सामंत यांनी दिली.

हे देखील वाचा: Toyota: टोयोटा महाराष्ट्रात ₹20,000 कोटींचा गुंतवणूक करणार, उपमुख्यमंत्री म्हणाले – 8,000 लोकांना रोजगार मिळेल

लोकसभा निवडणुकीमध्ये राज्यघटनेत बदल होईल असा अपप्रचार करण्यात आला होता. तसाच अपप्रचार उद्योगांबाबत पूर्वी करण्यात आला होता. वेदांता फॉक्सकॉन, एअरबस या प्रकल्पांचा पत्रव्यवहार नसताना पूर्वी केलेल्या कामाचे श्रेय आमच्यावर लादण्याचा प्रयत्न झाला. आता पुन्हा तोच प्रकार घडू शकतो, म्हणून कंपनी व्यवस्थापनातील अधिकाऱ्यांसह सरकारला मानपत्र देण्याचा कार्यक्रम छत्रपती संभाजीनगरमधील उद्योजकांनी आयोजित केला. या नव्या गुंतवणुकीमुळे मराठवाड्यात औद्योगिक वाढीला मोठी चालना मिळेल, असा दावा उद्योगमंत्री सामंत यांनी केला.

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
WhatsApp
Facebook
Twitter
LinkedIn
Telegram
मराठी ईनसाइडर Black logo

Marathi Insider हे भारतातील क्रमांक १ चे विश्वासार्ह आणि लोकप्रिय प्रादेशिक मराठी बातम्या देणारा गट आहे. आम्ही फक्त ताज्या घडामोडींची बातमी देत नाही, तर सरकारच्या योजना, तंत्रज्ञान, मोबाईल फोन, लॅपटॉप्स, स्मार्टवॉचेस आणि सोशल मीडियाचे सखोल विश्लेषण देखील करतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

लोकप्रिय कथा
कॅटेगरिज