Anganwadi Bharti 2024: अंगणवाडी मदतनीस पदांची भरती सुरू! | शैक्षणिक पात्रता – 12वी पास

Anganwadi Bharti 2024 - अंगणवाडी मदतनीस पदांची भरती सुरू! शैक्षणिक पात्रता – 12वी पास

Anganwadi Bharti 2024: एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या अंतर्गत कार्यरत बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालयाने अंगणवाडी मदतनीस पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. 12वी उत्तीर्ण उमेदवारांना महिला व बालविकास विभागात नोकरी मिळवण्याची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. भरतीची जाहिरात बालविकास प्रकल्प अधिकारी द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेल्या जाहिरातीची माहिती काळजीपूर्वक वाचून अर्ज सादर करावे.

भरती विभाग: बालविकास प्रकल्प अधिकारी द्वारे भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
भरती प्रकार: महिला व बालविकास विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी.
भरती श्रेणी: राज्य सरकार (State Government) अंतर्गत भरती केली जात आहे.
पदाचे नाव: अंगणवाडी मदतनीस
शैक्षणिक पात्रता: 12वी पास उमेदवार अर्ज करू शकतात. (मूळ PDF जाहिरात वाचावी.)
अर्ज सादर करण्याची पद्धत: ऑफलाइन (Offline)
मासिक वेतन: रुपये 5500/- (पाच हजार पाचशे रुपये)
वयोमर्यादा: 18 ते 35 वर्षे
भरती कालावधी: स्थायी नोकरीसाठी चांगली संधी
एकूण पदे: 25 रिक्त पदे
नोकरी ठिकाण: अमरावती उत्तर

विशेष सूचना:

  • उमेदवार स्थानिक प्रकल्प क्षेत्रांतर्गत रहिवासी असावा. (स्थानिक रहिवासी असल्याचे पुरावे जोडणे आवश्यक आहे.)
  • उमेदवारास जास्तीत जास्त 2 हयात अपत्य असावे.
  • 2 हयात अपत्यापेक्षा अधिक अपत्य असलेल्या उमेदवारांना नियुक्तीसाठी पात्र ठरणार नाही.
  • उमेदवाराने 10वी पर्यंत मराठी भाषा विषयासह उत्तीर्ण असावे. (10वी बोर्ड प्रमाणपत्र आवश्यक)
  • विधवा उमेदवारांसाठी मृत्यु दाखला व स्वप्रतिज्ञापत्र आवश्यक; अनाथ उमेदवारांसाठी प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे.
  • अंगणवाडी कर्मचा-यांची बदली करण्याची कोणतीही सुविधा उपलब्ध नाही.
  • शैक्षणिक गुणपत्रिकेमध्ये मिळालेल्या गुणांवर आधारित 75 गुण आणि अतिरीक्त 25 गुण शासन निर्णयानुसार दिले जातील.
  • अमरावती उत्तरमधील अचलपूर, दर्यापुर, अंजनगावसुजी आणि धारणी येथील फक्त उर्दू भाषिक अर्ज स्वीकारले जातील.

अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख: 03 सप्टेंबर 2024.

अर्ज पाठवण्याचा पत्ता:

बाल विकास प्रकल्प कार्यालय, (सिव्हिल) अमरावती उत्तर
C/o अधिवक्ता विलास काळे बिल्डिंग, रुख्मिणी नगर, अमरावती रोड (देवमाळी), परतवाडा, ता. अचलपूर, जि. अमरावती

महत्वाची नोट:
वरील माहिती अपूर्ण असू शकते. अर्ज सादर करण्यापूर्वी पूर्ण PDF जाहिरात वाचावी. अधिक माहितीसाठी PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

नमूना अर्ज पाहण्यासाठी – Click Here

सविस्तर जाहिरातीची PDF पाहण्यासाठी – Click Here

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
WhatsApp
Facebook
Twitter
LinkedIn
Telegram
मराठी ईनसाइडर Black logo

Marathi Insider हे भारतातील क्रमांक १ चे विश्वासार्ह आणि लोकप्रिय प्रादेशिक मराठी बातम्या देणारा गट आहे. आम्ही फक्त ताज्या घडामोडींची बातमी देत नाही, तर सरकारच्या योजना, तंत्रज्ञान, मोबाईल फोन, लॅपटॉप्स, स्मार्टवॉचेस आणि सोशल मीडियाचे सखोल विश्लेषण देखील करतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

लोकप्रिय कथा
कॅटेगरिज

ट्रेंडिंग बातम्या