Car Booking Open: बाजारात लोकप्रिय एमपीवी कारचे बुकिंग पुन्हा सुरु करण्यात आले आहे. टोयोटा कंपनीने भारतीय वाहन बाजारात ठसा उमठवला आहे. या कंपनीच्या वाहनांना बाजारात मोठी मागणी आहे.
भारतात मारुती सुझुकी, ह्युंदाई, टाटा मोटर्स आणि महिंद्रा यानंतर टोयोटा पाचव्या क्रमांकाची सर्वाधिक कार विकणारी कंपनी ठरली आहे. फुल साईझ एसयूव्ही बाजारात टोयोटा फॉर्च्यूनरची लोकप्रियता लक्षात घेण्यासारखी आहे. त्याचप्रमाणे, टोयोटाची एक एमपीव्ही कार भारतात खूप लोकप्रिय ठरली आहे. या कारची बाजारात उत्तम विक्री होत आहे. या कारच्या तगड्या मागणीमुळे कंपनीने काही दिवसांपूर्वी या कारचे बुकिंग बंद केले होते. आता कंपनीने या कारचे बुकिंग पुन्हा सुरू केले आहे.
टोयोटाने त्यांच्या लोकप्रिय MPV इनोव्हा हायक्रॉससाठी बुकिंग पुन्हा सुरू केले आहे. या कारला सातत्याने बुकिंग मिळत होते, परंतु अधिक मागणीमुळे कंपनीने या कारचे बुकिंग थांबवले होते.
टोयोटाने टॉप-स्पेक इनोव्हा हायक्रॉस व्हेरियंटसाठी बुकिंग पुन्हा सुरु केले आहे. तुम्ही ऑगस्टमध्ये इनोव्हा हायक्रॉस बुक केली, तर तुम्हाला डिलिव्हरीसाठी किती काळ प्रतीक्षा करावी लागेल ते पाहूया…
रिपोर्ट्सनुसार, जर तुम्ही आज टोयोटा इनोव्हा हायक्रॉस बुक केली, तर तुम्हाला या कारच्या डिलिव्हरीसाठी सहा महिन्यांपर्यंत प्रतीक्षा करावी लागेल. हे हायब्रिड प्रकारांना लागू होईल. सध्या ZX आणि ZX (O) प्रकारासाठी सर्वाधिक मागणी आहे. पेट्रोल प्रकारासाठी प्रतीक्षा कालावधी किमान २६ आठवडे आहे. ही सात आणि आठ सीटर एमपीव्ही आहे जी आरामदायी राइडसाठी प्रसिद्ध आहे. टोयोटा इनोव्हा हायक्रॉसला देशभरातील कारप्रेमींचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. ही MPV हायब्रिड आणि पेट्रोल इंजिन अशा दोन्ही पर्यायांसह उपलब्ध आहे. ही एक लक्झरी कार आहे जी अनेक चांगल्या आणि प्रीमियम वैशिष्ट्यांसह सुसज्ज आहे.
Toyota Innova Hycross ची एक्स-शोरूम किंमत ३०.९८ लाख रुपयांपासून सुरू होते. हे GX, GX (O), VX, VX (O), ZX आणि ZX (O) प्रकारांमध्ये उपलब्ध आहे. इंजिनबद्दल बोलायचे झाले तर या कारमध्ये १९८७ cc चे इंजिन आहे, जे १८३.७२bhp पॉवर आणि १८८ Nm टॉर्क प्रदान करते. कंपनीचा दावा आहे की हे एका लिटरमध्ये २३.२४ किलोमीटरचे मायलेज देते.
इनोव्हा हायक्रॉसमध्ये जागेची कमतरता नाही, यात सात ते आठ लोकांसाठी बसण्याची जागा आहे. सुरक्षेसाठी, एअरबॅग्स व्यतिरिक्त, अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम, अलॉय व्हील आणि पॉवर विंडो यासारखे फीचर्स देखील आहेत.