Dharmveer 2: ‘धर्मवीर २’ हा आनंद दिघे यांचा जीवनप्रवास उलगडणारा सिनेमा २०२२ मध्ये प्रदर्शित झाला होता. या सिनेमाला मिळालेल्या प्रचंड प्रतिसादानंतर आता ‘धर्मवीर २’ प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. प्रसाद ओक मुख्य भूमिकेत असलेला ‘धर्मवीर २’ २७ सप्टेंबर रोजी सर्वत्र प्रदर्शित झाला. ‘धर्मवीर’ सिनेमाच्या सीक्वलची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते आणि ‘धर्मवीर २’ ने त्यांची अपेक्षा पूर्ण केली आहे.
हे देखील वाचा: भरमसाठ इंटीमेट सीन असलेली वेब सीरिज, पाहायची असेल तर हेडफोन लावावा लागेल!
पहिल्या दिवसापासूनच ‘धर्मवीर २’ ने बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींची कमाई करण्यास सुरुवात केली. पहिल्याच दिवशी या सिनेमाने बॉक्स ऑफिसवरील मराठी सिनेमांचा रेकॉर्ड मोडला आणि १.९२ कोटींचा गल्ला जमवला. २०२४ मध्ये पहिल्या दिवशी सर्वाधिक कमाई करणारा ‘धर्मवीर २’ हा मराठी सिनेमा ठरला! वीकेंडमध्येही या सिनेमाला प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळाला, ज्यात दुसऱ्या दिवशी २.३५ कोटींची कमाई झाली.
चारच दिवसांत ‘धर्मवीर २’ ने बॉक्स ऑफिसवर ९.२७ कोटींचा गल्ला जमवला होता आणि आता सहा दिवसांत या सिनेमाने तब्बल १२.२८ कोटींचा व्यवसाय केला आहे!
हे देखील वाचा: सत्य घटनांवर आधारित Netflix चे 8 सर्वोत्तम भारतीय चित्रपट
‘धर्मवीर २’ सिनेमात प्रसाद ओकने आनंद दिघे यांची भूमिका साकारली आहे. या सिनेमातून प्रेक्षकांना आनंद दिघेंच्या हिंदुत्वाची प्रेरणादायक कथा पाहायला मिळणार आहे. प्रविण तरडेंनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. प्रसाद ओकबरोबर क्षितीश दाते आणि स्नेहल तरडे यासारखे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.