शाहीद कपूरची वेब सिरीज ‘फर्जी 2’ येत आहे? सहकलाकार भुवन अरोराने दिली अपडेट

Farzi 2: शाहीद कपूरची वेब सिरीज 'फर्जी 2' येत आहे? सहकलाकार भुवन अरोराने दिली अपडेट

Farzi 2: शाहीद कपूरच्या लोकप्रिय वेब सिरीज ‘फर्जी’ने (Farzi) मोठा धुमाकूळ घातला होता. शाहीदने यामधून ओटीटीवर पदार्पण केलं आणि ॲमेझॉन प्राईमवर रिलीज झालेल्या या सिरीजने सर्वांनाच खिळवून ठेवले. शाहीद कपूरने सिरीजमध्ये उत्कृष्ट अभिनय केला आहे, त्याची हुशारी एवढी आहे की तो हुबेहुब नोटा बनवतो आणि हळूहळू त्या धंद्यात उतरतो. मात्र सिरीजच्या शेवटी त्याला पकडले जाऊ शकते, असे संकेत होते. आता शाहीद आणि त्याचा मित्र पकडले जातात का हे ‘फर्जी 2’मध्ये स्पष्ट होणार आहे, याची माहिती पुढील भागात मिळणार आहे.

हे देखील वाचा: Raghuveer Movie Review: मनाची शक्ती ओळखण्याची दृष्टी देणाऱ्या रामदास स्वामींची कथा

राज आणि डीके दिग्दर्शित ‘फर्जी’ भारतातील सर्वात लोकप्रिय वेब सिरीज ठरली. शाहीद कपूर, विजय सेतुपती, के के मेनन, भुवन अरोरा आणि राशी खन्ना यांची या सिरीजमध्ये भूमिका आहे. भुवन अरोराने नुकतेच ‘फर्जी 2’ बद्दल एक खुलासा केला. डिजिटल कमेंट्रीला दिलेल्या मुलाखतीत त्याने सांगितले, “फर्जी 2 प्री-प्रोडक्शन स्टेजवर आहे. सीरिजचा पुढील भाग नक्की येईल. लेखकांचे काम सुरू आहे. अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही, पण मला वाटते की आम्ही ‘फर्जी 2’ बनवतोय. सध्या प्रत्येकजण व्यस्त आहे.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

भुवनने दिलेल्या या अपडेटनंतर ‘फर्जी 2’ सिरीजसाठीची उत्सुकता आणखी वाढली आहे. अद्याप शूटिंग सुरू झालेलं नाही, त्यामुळे सिरीजच्या प्रदर्शनासाठी बराच वेळ लागणार आहे. शाहीदच्या पहिल्या सिरीजने ओटीटीवर कमाल केली, त्यामुळे आता त्याच्या पुढील प्रोजेक्टसाठी चाहत्यांची अपेक्षा अधिक वाढली आहे.

हे देखील वाचा: Top 6 Films on Google Trends: ऑगस्ट २०२४ मध्ये गुगल ट्रेंड्सनुसार सर्वाधिक चर्चा झालेल्या चित्रपटांची यादी

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
WhatsApp
Facebook
Twitter
LinkedIn
Telegram
मराठी ईनसाइडर Black logo

Marathi Insider हे भारतातील क्रमांक १ चे विश्वासार्ह आणि लोकप्रिय प्रादेशिक मराठी बातम्या देणारा गट आहे. आम्ही फक्त ताज्या घडामोडींची बातमी देत नाही, तर सरकारच्या योजना, तंत्रज्ञान, मोबाईल फोन, लॅपटॉप्स, स्मार्टवॉचेस आणि सोशल मीडियाचे सखोल विश्लेषण देखील करतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

लोकप्रिय कथा
कॅटेगरिज

ट्रेंडिंग बातम्या