Heavy Rain in Kokan: विदर्भ आणि मराठवाड्यातील पावसाचा जोर कमी झाला असला तरी, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचे आगमन होणार आहे. गणेशोत्सवाच्या तोंडावर येणाऱ्या या पावसामुळे कोकणातील चाकरमान्यांची अडचण वाढण्याची शक्यता आहे.
हे देखील वाचा: मुख्यमंत्र्यांचे पावसामुळे झालेल्या नुकसानीचे ताबडतोब पंचनामे करण्याचे निर्देश
देशभरात कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पावसाची स्थिती गंभीर झाली आहे. राजस्थानपासून बंगालच्या उपसागरापर्यंत आणि गुजरातच्या दक्षिणेपासून केरळच्या मध्य किनारपट्टीपर्यंत सक्रिय असलेल्या या पट्ट्यामुळे कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाचे थैमान सुरू होईल. विदर्भातील काही भागांत पावसाचा जोर कायम राहील, असे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.
हे देखील वाचा: महाराष्ट्रात येत्या 48 तासांत मुसळधार पाऊस: विदर्भ आणि मराठवाड्यात अलर्ट!
सातारा आणि पुणे तसेच पश्चिम महाराष्ट्रातील घाट क्षेत्रांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आले आहे, तर मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि नाशिकसह इतर काही भागांमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. देशातील 20 राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे.
हे देखील वाचा: मराठवाड्यात पावसाचा तडाखा: जायकवाडी धरण भरले, बीड आणि जालना जिल्ह्यात पूरस्थिती
आयएमडीच्या माहितीनुसार, तेलंगण, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, बिहार, पश्चिम बंगाल, असम, मेघालय, नागालैंड, मणिपुर, मिजोरम, त्रिपुरा, अरुणाचल प्रदेश, सिक्किम, मध्य प्रदेश, छत्तीसगढ़, राजस्थान, गोवा, आंध्र प्रदेश आणि कर्नाटकमध्ये पावसाचा इशारा दिला आहे. हिमाचल प्रदेशात वादळी पावसाचे संकेत आहेत.
हे देखील वाचा: छत्रपती संभाजीनगरहून अहमदनगरला रेल्वेची ‘डबल लाइन’
सप्टेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात पावसाचा जोर कमी होईल, पण गणपती उत्सवाच्या काळात पावसाच्या सरींमुळे कोकणातील नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो. हवामान विभागाने सजग राहण्याचे आणि आवश्यक तयारी करण्याचे सूचन दिले आहे.