Jayakwadi Dam Water Level: राज्यात दोन दिवसांपासून पावसाने उघडीप दिली असून, धरणांचा पाणीसाठा सध्या स्थिर आहे. काही धरणांतून थोडक्यात पाणी सोडण्यात येत आहे. सध्या जायकवाडी धरणाचा उपयुक्त पाणीसाठा 65% म्हणजेच 50 टी.एम.सी. च्या पुढे गेलेला आहे. त्यामुळे नाशिक व अहमदनगर जिल्ह्यातील धरणांमधून पाणी सोडण्याची गरज भासणार नाही, विशेषत: छत्रपती संभाजीनगरसाठी. सध्या धरणांतून किती विसर्ग सुरु आहे हे पाहूया.
हे देखील वाचा: जायकवाडी धरण: १८ दरवाजे उघडले, गोदापात्रात विसर्ग सुरू
जायकवाडीसाठी 34 हजार दलघफू पाणी रवाना
नाशिक आणि नगरमधून 1 जूनपासून 28 ऑगस्ट पर्यंत तब्बल 34 हजार दलघफू पाणी जायकवाडीकडे पाठवण्यात आले आहे. समन्यायी वाटप करारानुसार जायकवाडी धरण 65% भरल्यानंतर गोदावरीतून त्यासाठी पाणी सोडण्याची सक्ती नाही. सध्या जायकवाडी 60% पेक्षा जास्त भरले आहे, त्यामुळे मराठवाड्याचा पाणी प्रश्न मार्गी लागण्याची चिन्हे दिसत आहेत.
हे देखील वाचा: मराठवाड्यात पावसाचा तडाखा: जायकवाडी धरण भरले, बीड आणि जालना जिल्ह्यात पूरस्थिती
धरणातून सोडलेला / नदीत सुरू असलेला विसर्ग (क्युसेक्स):
1. भंडारदरा धरण (प्रवरानदी): 1050 क्युसेक्स
2. निळवंडे धरण (प्रवरा नदी): 1447 क्युसेक्स
3. देवठाण (आढळा नदी): 508 क्युसेक्स
4. भोजापुर (म्हाळुंगी): 539 क्युसेक्स
5. ओझर (प्रवरा नदी): 4543 क्युसेक्स
6. कोतुळ (मुळा नदी): 3416 क्युसेक्स
7. मुळाडॅम (मुळा): 4000 क्युसेक्स
8. गंगापुर: 1059 क्युसेक्स
9. दारणा: 7010 क्युसेक्स
10. नां.मधमेश्वर (गोदावरी): 18610 क्युसेक्स
11. जायकवाडी (गोदावरी): 0000 क्युसेक्स
हे देखील वाचा: जायकवाडी धरण पूर्ण क्षमतेच्या जवळ; नाशिक-नगरमधून पाणी सोडण्याची आवश्यकता नाही
नवीन आवक (आजच्या दिवसापर्यंत एकूण):
1. भंडारदरा: 190/19511 दलघफू
2. निळवंडे: 439/18379 दलघफू
3. मुळा: 540/23778 दलघफू
4. आढळा: 50/1834 दलघफू
5. भोजापुर: 79/2066 दलघफू
6. जायकवाडी: 4.68/57.97 टी.एम.सी. (अंदाजे)
हे देखील वाचा: कोकणात मुसळधार पावसाच्या आगमनाची शक्यता! ऐन गणपतीच्या उत्सवात उडवणार तारांबळ