Lakhpati Didi Yojana: महिलांचं भाग्य बदलणारी योजना काय आहे? अर्ज कसा करायचा?

Lakhpati Didi Yojana: महिलांचं भाग्य बदलणारी योजना काय आहे? अर्ज कसा करायचा?

Lakhpati Didi Yojana: ‘लाडकी बहीण’ योजनेप्रमाणेच ‘लखपती दीदी’ योजना सध्या राज्यात चर्चेचा विषय बनली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये जळगावमध्ये या योजनेच्या संदर्भात नुकताच एक कार्यक्रम झाला.

हे देखील वाचा: Majhi Ladki Bahin Yojana: रकमेत होणार वाढ, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही

योजनेची सुरुवात

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्ट 2023 रोजी लाल किल्ल्यावरून देशाला उद्देशून भाषण करताना ‘लखपती दीदी’ योजनेची घोषणा केली. या योजनेनुसार महिलांना स्वयंरोजगारासाठी आर्थिक मदत म्हणून बिनव्याजी 1 ते 5 लाख रुपयांचे कर्ज दिले जाईल. आर्थिक दृष्ट्या वंचित असलेल्या महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी आणि स्वावलंबी बनवण्यासाठी केंद्र सरकारने ही योजना सुरू केली आहे.

हे देखील वाचा: Post Office RD Scheme: पोस्ट ऑफिसचे लेटेस्ट सुरक्षित आणि आकर्षक गुंतवणूक पर्याय

पात्रता

लखपती दीदी योजनेसाठी पात्रतेच्या अटी प्रत्येक राज्यात थोड्या वेगळ्या असू शकतात. सामान्य निकष खालीलप्रमाणे आहेत:

1. अर्ज करणारी फक्त महिला असावी.
2. संबंधित राज्याची रहिवाशी असावी.
3. वार्षिक उत्पन्न 3,00,000 रुपये (तीन लाख रुपये) पेक्षा कमी असावे.
4. वय 18 ते 50 वर्षांदरम्यान असावे.
5. महिला बचत गटाशी संबंधित असावी.

आवश्यक कागदपत्रे

लखपती दीदी योजनेसाठी अर्ज करताना खालील कागदपत्रे आवश्यक आहेत:

1. आधार कार्ड
2. पॅन कार्ड
3. उत्पन्न प्रमाणपत्र
4. पत्त्याचा पुरावा
5. शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र
6. पासबुक
7. मोबाईल नंबर
8. पासपोर्ट फोटो

महिला कशा होणार लखपती?

लखपती दीदी योजनेनुसार महिलांना वेगवेगळ्या कौशल्यांचे प्रशिक्षण दिले जाईल. या प्रशिक्षणादरम्यान महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी टिप्स दिल्या जातील. आर्थिक विषयांची माहिती देण्यासाठी वर्कशॉप्स आयोजित केली जातील, ज्यामध्ये बिझनेस प्लॅन, मार्केटिंग, बजेट, सेव्हिंग आणि गुंतवणुकीची माहिती दिली जाईल. तसेच, महिलांना तंत्रज्ञानाचा वापर, डिजिटल बँकिंग, मोबाईल वॉलेट, आणि फोन बँकिंग याबद्दल प्रशिक्षण दिले जाईल.

हे देखील वाचा: लाडकी बहीण योजनेचे पैसे आले का नाही ते मोबाईलवरून तपासा!

अर्ज कसा करायचा?

लखपती दीदी योजनेसाठी अर्ज करण्यासाठी महिलांनी ‘स्वयं मदत गट’ व्यवसाय योजना तयार करावी लागेल. व्यवसाय आराखडा तयार झाल्यानंतर, बचत गट योजना आणि अर्ज संबंधित सरकारी विभागाकडे पाठवण्यात येईल. अर्जाची छानणी आणि पुनरावलोकन केले जाईल. पात्रतेच्या सर्व निकषांची पूर्तता करणाऱ्या महिलांना या योजनेचा लाभ मिळेल. केंद्र सरकारची योजना आहे की 3 कोटी महिलांना या योजनेचा लाभ देण्यात येईल.

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
WhatsApp
Facebook
Twitter
LinkedIn
Telegram
मराठी ईनसाइडर Black logo

Marathi Insider हे भारतातील क्रमांक १ चे विश्वासार्ह आणि लोकप्रिय प्रादेशिक मराठी बातम्या देणारा गट आहे. आम्ही फक्त ताज्या घडामोडींची बातमी देत नाही, तर सरकारच्या योजना, तंत्रज्ञान, मोबाईल फोन, लॅपटॉप्स, स्मार्टवॉचेस आणि सोशल मीडियाचे सखोल विश्लेषण देखील करतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

लोकप्रिय कथा
कॅटेगरिज

ट्रेंडिंग बातम्या