‘मिर्झापूर ३’ मध्ये मुन्ना त्रिपाठीची पुन्हा एन्ट्री, या दिवशी रिलीज होणार खास बोनस एपिसोड

Mirzapur 3 - मुन्ना त्रिपाठीची पुन्हा एन्ट्री, या दिवशी रिलीज होणार खास बोनस एपिसोड

Mirzapur 3: ‘मिर्झापूर ३’ वेब सिरीजची चांगलीच चर्चा झाली आहे. काही महिन्यांपासून बहुप्रतिक्षित असलेल्या ‘मिर्झापूर ३’ने अखेरीस प्रेक्षकांच्या भेटीला येऊन सर्वांचे लक्ष वेधून घेतले. रहस्यमय थ्रिलर कथानकाने ‘मिर्झापूर’च्या चाहत्यांचे मन जिंकले. मात्र, या वेब सिरीजमध्ये एक गोष्ट सर्वांना खटकली, ती म्हणजे मुन्ना त्रिपाठीची अनुपस्थिती. मुन्ना त्रिपाठी म्हणजे अभिनेता द्विवेंदू शर्मा याची व्यक्तिरेखा दुसऱ्या सिझनमध्ये संपल्यामुळे ‘मिर्झापूर ३’मध्ये त्याचा समावेश नसल्याने चाहते निराश झाले होते. परंतु, आता ही निराशा दूर होणार आहे, कारण ‘मिर्झापूर ३’च्या लेटेस्ट एपिसोडमध्ये मुन्ना त्रिपाठीची खास झलक असणार आहे.

हे देखील वाचा: शाहीद कपूरची वेब सिरीज ‘फर्जी 2’ येत आहे? सहकलाकार भुवन अरोराने दिली अपडेट

या तारखेला रिलीज होणार ‘मिर्झापूर ३’चा एपिसोड

प्राइम व्हिडिओने नुकतेच एक टीझर रिलीज केले आहे. या टीझरमध्ये मुन्ना त्रिपाठीच्या भूमिकेत द्विवेंदू शर्माची झलक दिसते. “मी निघून गेलो म्हणजे एवढा बवाल झाला. माझ्या प्रामाणिक फॅन्सनी मला खूप मिस केलं असं मी ऐकलंय. सीझन ३ मध्ये तुम्ही खूप गोष्टी मिस केल्या आहेत. फक्त तुमच्यासाठी, मुन्ना त्रिपाठीच्या सौजन्याने मी काही गोष्टी शोधून आणल्या आहेत. कारण मी आधी करतो, नंतर विचार करतो.” उद्या ३० ऑगस्टला मुन्ना त्रिपाठीची खास झलक असलेला हा एपिसोड प्राइम व्हिडिओवर पाहायला मिळेल.

 

View this post on Instagram

 

A post shared by prime video IN (@primevideoin)

‘मिर्झापूर ३’ विषयी

‘मिर्झापूर’ सिरीजचा पहिला सिझन २०१८ मध्ये ॲमेझॉन प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित झाला होता. त्यानंतर दोन वर्षांनी २०२० मध्ये दुसरा सिझन आला. गेल्या वर्षी जून महिन्यापासून तिसऱ्या सिझनच्या शूटिंगला सुरुवात झाली. आता या वर्षी ‘मिर्झापूर ३’ प्रदर्शित होणार आहे. मार्च महिन्यात तिसऱ्या सिझनची घोषणा करण्यात आली होती.

हे देखील वाचा: Raghuveer Movie Review: मनाची शक्ती ओळखण्याची दृष्टी देणाऱ्या रामदास स्वामींची कथा

‘मिर्झापूर २’ मध्ये कालिन भैय्या म्हणजेच पंकज त्रिपाठीचा मुलगा मुन्ना त्रिपाठी म्हणजेच दिव्येंदू शर्मा याचा मृत्यू दाखवण्यात आला होता. तेव्हापासून प्रेक्षक ‘मिर्झापूर ३’च्या प्रतीक्षेत आहेत. या सिझनमध्ये पंकज त्रिपाठी, अली फजल, श्वेता त्रिपाठी, रसिका दुग्गल यासह विवान सिंह, ईशा तलवार, शाहनवाज प्रधान, राजेश तैलांग, शीबा चड्ढा, विजय शर्मा यांसारखे अनेक कलाकार जुने पात्र साकारणार आहेत. द्विवेंदूच्या बोनस एपिसोडमध्ये काय पाहायला मिळणार, याची सर्वांना उत्सुकता आहे.

हे देखील वाचा: ‘छावा’ चित्रपटात औरंगजेबाची भूमिका कोण करतंय, तुम्हाला माहिती आहे का?

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
WhatsApp
Facebook
Twitter
LinkedIn
Telegram
मराठी ईनसाइडर Black logo

Marathi Insider हे भारतातील क्रमांक १ चे विश्वासार्ह आणि लोकप्रिय प्रादेशिक मराठी बातम्या देणारा गट आहे. आम्ही फक्त ताज्या घडामोडींची बातमी देत नाही, तर सरकारच्या योजना, तंत्रज्ञान, मोबाईल फोन, लॅपटॉप्स, स्मार्टवॉचेस आणि सोशल मीडियाचे सखोल विश्लेषण देखील करतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

लोकप्रिय कथा
कॅटेगरिज

ट्रेंडिंग बातम्या