Netflix Real Life Based Movies: OTT: प्लॅटफॉर्मवर अनेक चित्रपट उपलब्ध आहेत, पण आज आपण नेटफ्लिक्सवरील काही भारतीय चित्रपटांवर लक्ष केंद्रित करणार आहोत, जे सत्य घटनांवर आधारित आहेत.
1. महाराजा
हा चित्रपट गुजरातचे लेखक, कवी, पत्रकार आणि समाजसुधारक करसनदास मुळजी यांच्यावर आधारित आहे. या चित्रपटातून आमिर खानचा मुलगा जुनैद खानने मोठ्या पडद्यावर एन्ट्री केली आहे.
हे देखील वाचा: Stree 2 OTT Release: ब्लॉकबस्टर ‘स्त्री २’ ओटीटीवर दाखल, कुठे पाहता येणार?
2. अमर सिंह चमकिला
पंजाबचे प्रसिद्ध गायक अमर सिंह चमकिला यांची 1988 मध्ये हत्या करण्यात आली होती. हा चित्रपट त्यांच्या जीवनावर आधारित आहे.
3. 83
भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार कपिल देव यांच्यावर आधारित 83 हा चित्रपट नेटफ्लिक्सवर उपलब्ध आहे. यात रणवीर सिंग मुख्य भूमिकेत आहे.
हे देखील वाचा: Top 6 Films on Google Trends: ऑगस्ट २०२४ मध्ये गुगल ट्रेंड्सनुसार सर्वाधिक चर्चा झालेल्या चित्रपटांची यादी
4. पानिपत
हा चित्रपट 18 व्या शतकातील भारतातील अफगाण आक्रमण आणि मराठ्यांच्या युद्धावर आधारित आहे.
5. सूरमा
भारतीय हॉकी संघाचे माजी कर्णधार संदीप सिंग यांच्या जीवनावर आधारित सूरमा चित्रपटात दिलजीत दोसांझने त्यांची भूमिका साकारली आहे.
हे देखील वाचा: Bigg Boss Marathi Season 5: जान्हवीला नवऱ्याचा सल्ला; म्हणाला, “स्वत:वर कंट्रोल ठेव”
6. संजू
बॉलिवूड अभिनेता संजय दत्तच्या जीवनावर आधारित संजू हा चित्रपट नेटफ्लिक्सवर उपलब्ध आहे. यात संजय दत्तची भूमिका रणबीर कपूरने साकारली आहे.
7. शाबाश मिथू
हा स्पोर्ट्स ड्रामा चित्रपट भारतीय महिला राष्ट्रीय क्रिकेट संघाची माजी कर्णधार मिताली राज हिचा चरित्रपट आहे, ज्यामध्ये तिची भूमिका तापसी पन्नूने साकारली आहे.
हे देखील वाचा: भरमसाठ इंटीमेट सीन असलेली वेब सीरिज, पाहायची असेल तर हेडफोन लावावा लागेल!
8. द स्काय इज पिंक
या चित्रपटात प्रियांका चोप्रा आणि फरहान अख्तर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाची कथा मोटिव्हेशनल स्पीकर आयेशा चौधरीच्या जीवनावर आधारित आहे.
हे सर्व चित्रपट सत्य घटनांवर आधारित असून, त्यांचा अनुभव घेण्यासाठी नेटफ्लिक्सवर उपलब्ध आहेत.