‘पंचायत’ चे पुढचे दोन्ही सीझन एकत्रच शूट होणार? सीरिजबाबत महत्वाची अपडेट

Panchayat: पुढचे दोन्ही सीझन एकत्रच शूट होणार सीरिजबाबत महत्वाची अपडेट

Panchayat: ‘पंचायत’ या वेब सिरीजच्या पुढील दोन सीझन एकत्रच शूट केले जाणार आहेत अशी माहिती समोर आली आहे. ‘पंचायत’ ही वेब सिरीज अलीकडेच तिसऱ्या सीझनसह चर्चेत आली होती. पहिल्या दोन सीझनप्रमाणेच तिसऱ्या सीझनला देखील प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली. या सिरीजची साधी कथा आणि अप्रतिम अभिनयामुळे अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे.

हे देखील वाचा: ‘मिर्झापूर ३’ मध्ये मुन्ना त्रिपाठीची पुन्हा एन्ट्री, या दिवशी रिलीज होणार खास बोनस एपिसोड

ताज्या अपडेट्सनुसार, चौथा आणि पाचवा सीझन एकत्रच ऑक्टोबरमध्ये शूट केला जाणार आहे. ‘पंचायत’ ही फुलेरा गावातील प्रधान, सरपंच, सचिव आणि गावातील राजकारण याभोवती फिरते. तिसऱ्या सीझनच्या शेवटी प्रधानजींवर हल्ला झाला असून ते हॉस्पिटलमध्ये आहेत. सचिवजी परीक्षा देऊन परत आले आहेत. पुढील सीझनमध्ये प्रधानजींवर हल्ला करणाऱ्याची ओळख काय आहे हे उलगडले जाईल.

 

View this post on Instagram

 

A post shared by panchayat (@panchayat.season_3)

चौथ्या सीझनमध्ये तीन प्रमुख ट्रॅक असतील: निवडणूक, सचिव आणि रिंकीची लव्हस्टोरी, आणि प्रल्हादचा निवडणुकीला असलेला विरोध. हे सर्व मुद्दे पुढील दोन सीझनमध्ये दाखवले जातील.

हे देखील वाचा: शाहीद कपूरची वेब सिरीज ‘फर्जी 2’ येत आहे? सहकलाकार भुवन अरोराने दिली अपडेट

आत्तापर्यंत ‘पंचायत’च्या प्रत्येक सीझनमध्ये नवीन पात्रांची ओळख झाली आहे. त्यामुळे चौथ्या आणि पाचव्या सीझनमध्ये काय धमाल येणार आहे याची चाहत्यांना उत्सुकता लागून राहिली आहे. तसेच, या दोन सीझनच अंतिम असतील का याबाबतची माहिती अजून मिळालेली नाही. ‘पंचायत’च्या पुढील अपडेट्ससाठी चाहत्यांचे लक्ष लागून आहे.

हे देखील वाचा: Raghuveer Movie Review: मनाची शक्ती ओळखण्याची दृष्टी देणाऱ्या रामदास स्वामींची कथा

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
WhatsApp
Facebook
Twitter
LinkedIn
Telegram
मराठी ईनसाइडर Black logo

Marathi Insider हे भारतातील क्रमांक १ चे विश्वासार्ह आणि लोकप्रिय प्रादेशिक मराठी बातम्या देणारा गट आहे. आम्ही फक्त ताज्या घडामोडींची बातमी देत नाही, तर सरकारच्या योजना, तंत्रज्ञान, मोबाईल फोन, लॅपटॉप्स, स्मार्टवॉचेस आणि सोशल मीडियाचे सखोल विश्लेषण देखील करतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

लोकप्रिय कथा
कॅटेगरिज

ट्रेंडिंग बातम्या