Raghuveer Movie Review: मनाची शक्ती ओळखण्याची दृष्टी देणाऱ्या रामदास स्वामींची कथा

Raghuveer Movie Review - मनाची शक्ती ओळखण्याची दृष्टी देणाऱ्या रामदास स्वामींची कथा

Raghuveer Movie Review: दिग्दर्शक निलेश कुंजीर यांनी ‘रघुवीर’ या चित्रपटात संत रामदास स्वामींची जीवनगाथा आणि त्यांचे कार्य याचे महत्त्वपूर्ण वर्णन केले आहे. रामदास स्वामींनी आपल्या ज्ञानाने आणि भक्तीने जगाला मनाची शक्ती ओळखण्याची दृष्टी दिली.

हे देखील वाचा: Top 6 Films on Google Trends: ऑगस्ट २०२४ मध्ये गुगल ट्रेंड्सनुसार सर्वाधिक चर्चा झालेल्या चित्रपटांची यादी

कथानक

चित्रपटात १६व्या शतकातील संत रामदास स्वामींच्या जीवनप्रवासाची आणि त्यांच्या शिकवणीची सुसंगत कथा दाखवली आहे. १६०८ मध्ये जांब गावात सूर्याजीपंत आणि राणूबाई यांना पुत्ररत्न प्राप्त झाले. त्याचे नाव नारायण ठेवण्यात आले. नारायणला लहानपणापासूनच विश्वाची चिंता लागली होती. १२ व्या वर्षी त्याचे लग्न ठरवले जाते, पण ‘शुभमंगल सावधान’ हे शब्द ऐकताच तो लग्न मंडपातून पळून जातो. प्रभू श्रीरामाच्या भक्तीत तल्लीन होऊन नारायण रामदास स्वामी बनतो आणि १२ वर्षे भ्रमंती करतो.

लेखन-दिग्दर्शन

या चित्रपटाची कथा ज्ञान, भक्ती आणि शक्तीचा अनोखा संगम दर्शवते. पटकथेची मांडणी प्रेरणादायी असून, आध्यात्मिकतेने परिपूर्ण आहे. रामदास स्वामींच्या मनाच्या श्लोकांचा अभ्यास शाळकरी मुलांनाही परिचित आहे. भक्तीसोबतच व्यायामाचे महत्त्व त्यांनी सांगितले. परचक्र येण्याच्या वेळी टाळ वाजवणाऱ्या हातांना तलवारी हातात घ्याव्यात हा संदेश त्यांनी दिला. स्त्री सक्षमीकरणाचे महत्त्व त्यांनी देखील सांगितले. ११ मारूतींची प्राणप्रतिष्ठापना केली आणि ‘दासबोध’ सारखा ग्रंथ लिहिला. संवाद प्रभावी आणि अर्थपूर्ण आहेत, पण काही घटनांची अधिक तपशीलवार माहिती असावी अशी अपेक्षा होती. चित्रपटाची ऐतिहासिक वातावरण निर्मिती चांगली आहे, पण नाट्यमय घटनांचा अभाव असल्याने माहितीपटासारखा अनुभव येतो. रवींद्र साठ्येंच्या गाण्याचे संगीत श्रवणीय आहे आणि हिमालयापासून वाळवंटापर्यंतचे चित्रीकरण अप्रतिम आहे.

हे देखील वाचा: ‘छावा’ चित्रपटात औरंगजेबाची भूमिका कोण करतंय, तुम्हाला माहिती आहे का?

अभिनय

विक्रम गायकवाडने रामदास स्वामींच्या भूमिकेत तसूभरही कमी पाडले नाही. संयमी भूमिकेची चांगली अदा केली असून, तापट स्वभावाचे झलक सुद्धा चांगले दाखवले आहे. ऋजुता देशमुख आईच्या भूमिकेत पूर्णपणे प्रभावी दिसत नाही, पण तिने चांगले काम केले आहे. नवीन प्रभाकरने ग्रे शेड असलेल्या छोट्या भूमिकेत उत्कृष्ट काम केले आहे. शैलेश दातार, राहुल मेहेंदळे, विघ्नेश जोशी, निनाद कुलकर्णी, भूषण तेलंग, वर्षा दांदळे, मौसमी तोंडवळकर यांनीसुद्धा चांगली साथ दिली आहे.

हे देखील वाचा: Bigg Boss 18 अपडेट: सलमान खानच्या शोमध्ये मचणार हुडदंग, सुरभी ज्योति आणि इतर 9 स्टार्सना मिळाला तगडा ऑफर

सकारात्मक बाजू: संत विचार, कथा, पटकथा, अभिनय, गीत-संगीत, दिग्दर्शन, वातावरण निर्मिती नकारात्मक बाजू: काही ऐतिहासिक संदर्भ, माहितीपटासारखा अनुभव

थोडक्यात: हा चित्रपट संत रामदास स्वामींच्या जगदोद्धार कार्याची आजच्या पिढीपर्यंत पोहोचवणारी महत्त्वपूर्ण कथा आहे. संतांचे आचार-विचार जाणून घेण्यासाठी हा चित्रपट एकदा पाहायला हवा.

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
WhatsApp
Facebook
Twitter
LinkedIn
Telegram
मराठी ईनसाइडर Black logo

Marathi Insider हे भारतातील क्रमांक १ चे विश्वासार्ह आणि लोकप्रिय प्रादेशिक मराठी बातम्या देणारा गट आहे. आम्ही फक्त ताज्या घडामोडींची बातमी देत नाही, तर सरकारच्या योजना, तंत्रज्ञान, मोबाईल फोन, लॅपटॉप्स, स्मार्टवॉचेस आणि सोशल मीडियाचे सखोल विश्लेषण देखील करतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

लोकप्रिय कथा
कॅटेगरिज

ट्रेंडिंग बातम्या