महाराष्ट्रात येत्या 48 तासांत मुसळधार पाऊस: विदर्भ आणि मराठवाड्यात अलर्ट!

Rain Update Today - महाराष्ट्रात येत्या 48 तासांत मुसळधार पाऊस विदर्भ आणि मराठवाड्यात अलर्ट!

Rain Update Today: महाराष्ट्रात येत्या 48 तासांत मुसळधार पाऊस होणार आहे. सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीस राज्यात पाऊस सुरू झाला असून अनेक जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडत आहे. पावसामुळे नदी-नाले तुडूंब भरून वाहत असून पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये मोठा जलसाठा जमा झाला आहे.

हे देखील वाचा: मराठवाड्यात पावसाचा तडाखा: जायकवाडी धरण भरले, बीड आणि जालना जिल्ह्यात पूरस्थिती

भारतीय हवामान खात्याने सूचित केले आहे की पुढील दोन दिवस राज्यात पावसाची तीव्रता कायम राहील. विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान खात्याच्या माहितीनुसार, पूर्व विदर्भ आणि तेलंगणावर असलेल्या कमी दाबाच्या पट्ट्याची तीव्रता कमी झाली आहे. येत्या 48 तासांत मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यात वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे.

मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, धाराशिव आणि लातूर जिल्ह्यांना तुफान पावसाचा इशारा आहे. विदर्भातील बुलढाणा, अमरावती, अकोला, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली आणि वाशिम जिल्ह्यातही जोरदार पावसाची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

हे देखील वाचा: जायकवाडी धरण पूर्ण क्षमतेच्या जवळ; नाशिक-नगरमधून पाणी सोडण्याची आवश्यकता नाही

नाशिकमध्ये दिवसभर ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज आहे. अहमदनगर आणि पुणे जिल्ह्यांना देखील पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे. सोलापूर, सांगली, कोल्हापूर आणि पश्चिम महाराष्ट्रातील इतर भागांत तुफान पावसाची शक्यता आहे. मुंबईसह उपनगरात पावसाच्या हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी कोसळतील, असे हवामान खात्याने सांगितले आहे.

घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे, त्यामुळे पर्यटकांनी काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे. जोरदार पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांमधील पाणीसाठ्यात यंदा भरपूर वाढ झाली असून जवळपास 97 टक्के पाणी जमा झाले आहे. उर्ध्व वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी ही सातही धरणं काठोकाठ भरले आहेत.

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
WhatsApp
Facebook
Twitter
LinkedIn
Telegram
मराठी ईनसाइडर Black logo

Marathi Insider हे भारतातील क्रमांक १ चे विश्वासार्ह आणि लोकप्रिय प्रादेशिक मराठी बातम्या देणारा गट आहे. आम्ही फक्त ताज्या घडामोडींची बातमी देत नाही, तर सरकारच्या योजना, तंत्रज्ञान, मोबाईल फोन, लॅपटॉप्स, स्मार्टवॉचेस आणि सोशल मीडियाचे सखोल विश्लेषण देखील करतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

लोकप्रिय कथा
कॅटेगरिज

ट्रेंडिंग बातम्या