Scholarship For Medical Students: अनेक विद्यार्थ्यांना शैक्षणिक खर्च उचलणे शक्य होत नसल्यामुळे त्यांचे शिक्षणावर परिणाम होत आहे. यावर विचार करून राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. वैद्यकीय शिक्षणासाठी शुल्क कमी करण्याचे निर्णय घेतल्यामुळे आर्थिक दृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
हे देखील वाचा: मुख्यमंत्र्यांचे पावसामुळे झालेल्या नुकसानीचे ताबडतोब पंचनामे करण्याचे निर्देश
ईडब्ल्यूएस (EWS) घटकातील विद्यार्थ्यांसाठी सरकारने वैद्यकीय शिक्षणाच्या अभ्यासक्रमासाठी संपूर्ण शुल्क भरण्याची सक्ती न ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे आर्थिक समस्यांमुळे शैक्षणिक नुकसान होणाऱ्या विद्यार्थ्यांना आता संधी मिळणार आहे.
सरकारच्या निर्णयानुसार, राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना (Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj Education Fee Scholarship Scheme) अंतर्गत विद्यार्थ्यांना मिळणारी शिष्यवृत्ती रक्कम आता प्रवेशाच्या वेळी 50% भरण्याची गरज नाही. या योजनेत पात्र विद्यार्थ्यांना मिळणारे शिक्षण शुल्क बँकेत जमा होत असल्यामुळे, त्यातल्या काही रकमेचे भरणे प्रवेशाच्या वेळी टाळता येईल.
हे देखील वाचा: PM Yashasvi Scholarship Yojana 2024-25: या विद्यार्थ्यांना ₹1,25,000 ची शिष्यवृत्ती मिळणार
या निर्णयामुळे पालकांवर आणि विद्यार्थ्यांवर असलेला तणाव कमी होणार आहे आणि शिक्षण प्राप्ती सुलभ होईल.